
वसंत राठोड, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, रेखा विधाते व शशांक कुलकर्णी यांची भाजपच्या प्रदेश निमंत्रण सदस्यपदी नियुक्ती
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर शहरातील ५ कार्यकर्त्यांची प्रदेश कार्यकारणीत निमंत्रित सदस्यपदी एकाचवेळी नियुक्ती केली आहे. एकाचवेळी शहरातील ५ कार्यकर्त्यांची प्रदेश कार्यकारणीत नियुक्ती होण्याची ही पहिलीच घटना आहे. यामध्ये भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वंसत राठोड, माजी शहरजिल्हा उपाध्यक्ष संतोष गांधी, माजी स्थायी समिती सभपती नरेंद्र कुलकर्णी, महिला ओबीसी विभागाच्या माजी शहराध्यक्षा रेखा विधाते व शशांक कुलकर्णी यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारणीत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या काही दिवसात होणारी लोकसभा निवडणूक व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या महत्वाच्या मानल्या जात आहेत. भाजपाचे नगर शहर विधानसभा निवडणूक प्रमुख भैय्या गंधे यांच्या प्रयत्नातून या नियुक्त्या झाल्या आहेत.
एकाच वेळी ५ सदस्यांची प्रदेशावर नियुक्ती होण्याची ही शहर भाजपच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा विश्वास नगर शहरावर व्यक्त केला आहे. पक्ष संघटन कार्याला मोठी बळकटी मिळणार असल्याच्या प्रतिक्रीया भैय्या गंधे यांनी व्यक्त केल्या आहेत.
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा.सुजय विखे, प्रदेश उपाध्यक्ष आ.राम शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.