ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ॲड. सचिन जगताप ‘शंभूगर्जना’ पुरस्काराने सन्मानित… सामाजिक कार्याचा गौरव

ॲड सचिनभाऊ अरुणकाका जगताप यांना किल्ले धर्मवीर गडावर शंभूगर्जना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले धर्मवीरगड, पेडगाव ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर येथे बलिदान स्फूर्ती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

सचिनभाऊ जगताप यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना “शंभूगर्जना” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जगताप घराण्याचा लोकसेवेचा वारसा पुढे घेऊन जाणारे सचिनभाऊ जगताप हे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असून मांडवगण गटाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. त्यांच्या पत्नी सुवर्णाताई जगताप या सध्या या गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

अहमदनगर शहरातील नामांकित कै. गंगाधर गुणे शास्त्री आयुर्वेद महाविद्यालयाचे सचिव म्हणून सचिन जगताप कार्यरत आहेत,

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून मराठा अश्वदळाचा महत्वाचा घटक असलेल्या भीमथडी जातीच्या अश्वांना केंद्र सरकारने नुकतीच अधिकृत मान्यता दिली असून या कार्यात सचिन जगताप यांनी मोलाची भुमिका बजावली आहे…

अहमदनगर शहरातील कलाकारांना चित्रपट, कला, सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी यासाठी सचिन जगताप हे सध्या अहमदनगर शहरात चित्रपट सृष्टी उभी रहावी यासाठी प्रयत्न करत आहेत.

गेल्या वर्षी अहमदनगर शहरात त्यांनी पहिल्या अरुणोदय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले. यामध्ये देश विदेशातून ३०० हून अधिक असून चित्रपटांनी सहभाग नोंदवला आहे.

अरुणोदय ए.जे. प्राॅडक्शनच्या माध्यमातून त्यांनी शहरातील कलाकार, तंत्रज्ञ यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे