
मार्कंडेय मॉर्निग ग्रुपचा उल्लेखनीय उपक्रम
“आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती ती
झांशीची राणी
मावळ्यांची भवानी तू
प्रत्येकाला लाभलेली उन्नती तू
आजच्या युगाची प्रगती तू …!!
आई, ताई, मैत्रीण, पत्नी, आजी अश्या विविध भूमिका समर्थपणे पार पाडणाऱ्या नारीच्या सन्मानाचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन ….!! या दिनाच्या औचित्याने येथील बाळासाहेब देशपांडे अर्थात सिद्धीबागेतल्या श्री मार्कंडेय मॉर्निग ग्रुपने कष्टकरी महिला भगिनींचा पुष्पगुच्छ व साडी देऊन सन्मान केला.
“स्त्री, महिला या कशातच कमी नाहीत, आज या घरात स्वच्छता व सर्व व्यवस्थापन करण्यापासून तर देशाचे राष्ट्रपतीपद भूषवण्यापर्यंत सर्व क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. त्यांचा सन्मान हा आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने एकच दिवस न करता आपण वर्षभर तीनशे पासष्ट दिवसही केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केल्यासारखे होईल …!!’ असे मार्कंडेय मॉर्निग ग्रुपचे सचिव श्री रमेश भुसा म्हणाले.
आमच्या सारख्या स्वयंपाकाच्या ठिकाणी कामकरनाऱ्यांच्या कष्टाची जाण ठेवून आजच्या या दिवशी आमचा केलेला हा सन्मान आम्हाला कायम आठवणीत राहणारा ठरेल…..!!’ असे सन्मानार्थी महिला सौ. रेखा शिरसुल व सौ. सुनिता गोसके आपल्या मनोगतात म्हणाल्या.
याप्रसंगी या भगिनींना स्नेह भेट म्हणून प्रत्येकी एक साडी हि श्री त्रिलेश येनगंदुल व विनायक बत्तीन यांच्यावतीने देण्यात आले यावेळी सिद्धी बाग महिला मॉर्निंग ग्रुपच्या सदस्या सौ मुथा, सौ पाठक, सौ कलवडे, सौ ठाकूर, सौ भालेराव, सौ शेख , सौ खान या महिला भगिनी यांच्यासह श्री मार्कंडेय मॉर्निग ग्रुपचे सदस्य विठ्ठल गुंडू, दत्तात्रेय बडगु, विजय येंगंदुल, कुमार आडेप, शंकर नक्का ,रमेश बोगा, विनायक बत्तीन, किशोर रोकडे, रमेश कोंडा, राजेंद्र कर्नावट, कृष्णा संभार, श्रीनिवास श्रीगादी, सुभाष श्रीपत, बालराज रायपेल्ली, रवी बेती, चंद्रकांत दंडी, ज्ञानेश्वर मंगलारम त्रिलेश येनगंदुल, गणेश तलवारे हे उपस्थित होते.