ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मेहकर येथे तथागत ग्रुपच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर व समाजभुषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

बुलढाणा

मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिन व प्रजासत्ताक दिनांचे औचित्य साधून तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने रक्तदान शिबिराचे व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार वितरण सोहळा तसेच जानेफळ एक्सप्रेसच्या कँलिन्डरचे प्रकाशनाचे आयोजन केले असता यावेळी कांतादेवी डाळे ब्लड सेन्टर व त्यांच्या टीमच्या सहकार्याने मेहकर शहरात मोठ्या प्रमाणात 31 रक्तदात्यांनी रक्तदान करुन यावेळी सहकार्य केले .

व तथागत ग्रुपला ज्या पदाधिकार्यांनी अहोरात्र वाढविण्यासाठी सहकार्य केले आशा पदाधिकारी यांचा सत्कार व समाजभुषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेले असे तथागत ग्रुपचे गौतम नरवाडे,अख्तर कुरेशी, राधेश्याम खरात, सचिन गवई, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, संदिप राऊत यांना हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक मेहकर शहराचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सामाजिक बांधिलकी जोपासणारे मा.राजेंद्र शिंगाटे साहेब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत ग्रुपचे मार्गदर्शक भाई कैलास सुखधाने व प्रमुख मार्गदर्शक तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई हे होते.

कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थिती मान्यवर ॲड.देवकांत मेश्राम साहेब,संतोष खरात,कुणाल माने, सुनिल वनारे,पत्रकार फिरोजभाई शहा,शोएब अली,जफरभाई शाह,संजय वानखेडे या सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले..

यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई, अंकुश राठोड , गजानन सरकटे, प्रकाश सुखधाने, राधेशाम खरात, मा.सचिन गवई, गौतम पैठणे,गौतम नरवाडे, संदिप राऊत,रूपेश गवई,गणेश वानखेडे,राम डोंगरदिवे, श्रीकृष्ण शटाणे, नितीन बोरकर, अनिल धांडे,महिला आघाडी सौ.निताताई पैठणे, सौ.कांचन मोरे,सौ.वंदना,माने,लक्ष्मी ताई कस्तुरे,राधाताई यंगड आदी समस्त तथागत ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मेहकर शहरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे