ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग?

मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दाऊद याच्यावर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, मागील दोन दिवसांपासून दाऊद इब्राहिमवर संबंधित रुग्णालयात उपचार केले जात आहेत. रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून संबंधित मजल्यावर तो एकमेव रुग्ण आहे.

फक्त उच्च वैद्यकीय अधिकारी आणि त्याच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांनाच तिथे प्रवेश देण्यात येत आहे. या काळात पाकिस्तानातील इंटरनेट सेवाही बंद होती. समाज माध्यमांद्वारे कोणतेही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी सेवा बंद करण्यात आल्याचे बोललं जातं आहे. मुंबई पोलीस अथवा गुन्हे शाखेने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. तसेच पाकिस्तानी माध्यमांनीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बातमी प्रसिद्ध केलेली नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे