विजय दिवस हा राष्ट्रीय स्तरावर साजरा करणे गरजेचे – सभापती गोकुळ दौंड
अहमदनगर - माजी सैनिक बहुद्देशीय संस्था, भिंगार च्या वतीने विजय दिवस साजरा

शहीद स्मारक सत्यभामा मंगल कार्यालय, शांती नगर या ठिकाणी दिनांक 16/12/1971 ला लष्कर प्रमुख जनरल श्री माणिक शॉ. याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान ला युद्धात पराभूत करून, बांगलादेशाला भारताने स्वतंत्र मिळवून दिले या युद्धात जे जवान शहीद झाले त्या शहीद जवानांना माजी सैनिक बहुद्देशीय संस्था, भिंगार, अहमदनगर च्या वतीने पाथर्डी तालुका पंचायत समिती चे सभापती गोकुळ दौॅड व विश्व निर्मल फौंडेशन शैक्षणिक संस्थे चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांच्या उपस्थितीत श्रध्दांजली अर्पित केली.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास गुंड संस्थापक श्री संजय वाघ संचालकश्री कुंडलिक ढाकणे व श्री केदार रामदास संस्थेचे सचिव- श्री शेख सिकंदर संस्थेचे खजिनदार-श्री बापू फारताडे ,कार्याध्यक्ष- श्री संजय ढाकणे आदी उपस्थित होते.
या वेळी पाथर्डी तालुका पंचायत समिती चे सभापती श्री गोकुळ दौंड म्हणाले विजय दिन हा आपल्या अनेक सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिल्यामुळे प्राप्त झाले या मुळे विजय दिन हा राष्ट्रीय स्तरावर शहिदाना श्रद्धांजली वाहून साजरा करावे असे आवाहन केले.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले आज चा दिवस हा भारतासाठी गर्वाचा दिवस आहे. आज माजी सैनिकांनी हा दिवस साजरा केला जे जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहिली हे कार्य कौतुकास्पद असून हा विजय दिन संपूर्ण भारतात साजरा करायला पाहिजे. माजी सैनिक या संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास गुंड यांनी माजी सैनिक बहुद्देशीय संस्थे चे कार्या बाबत माहिती दिली. संस्थेचे संस्थापक संजय वाघ यांनी उपस्थितीतांचे स्वागत केले तर आभार संस्थेचे सचिव श्री शेख सिकंदर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्र संचालन- संस्थेचे संचालक श्री कुंडलिक ढाकणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होणे साठी संस्थेचे विश्वस्थ श्री रावण साळवे , सुरेंद्र खेडकर, गहिनीनाथ पालवे, जालिंदर मगर, लक्ष्मण खराडे, जालिंदर फुंदे, मोईदिन शेख अकबर तसेच सदस्य श्री बाळू रणशिंग, दिलीप पालवे, राजु शिरसाट, बबन घागरे, सातपुते, जाधव, पिंगळे, वारे, आंधळे, साबळे, अनिल गवंडे,चौधर,पोपट दहिफळे व सामाजिक कार्यकर्ते श्री सोमनाथ आव्हाड, सावकार गर्जे आदीनी परिश्रम घेतले.