ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर मनमाड रोडवर हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट, एका हॉटेलवर पोलिसांचा छापा

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील पिंपरी निर्मळ येथे एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला आहे.पिंपरी निर्मळ शिवारात नगर मनमाड रोडवर हॉटेल साई श्रद्धा येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु होते.

पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत छापा टाकत परप्रांतीय मुलींची सुटका केली आहे.

१४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पिंपरी निर्मळ शिवारात नगर मनमाड रोडवर हॉटेल साई श्रद्धा येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याबाबत खात्रीशिर बातमी पोलिसांना मिळाली.

त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन एका पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.

या छाप्यात दोन आरोपीना ताब्यात घेण्यात आले. महिला पोलीस अमलदार संगीता नागरे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, वैभव कलूबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी शिरीष वमने, पो. नि. कैलास वाघ आदींनी केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे