
पुण्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरण प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ३ आरोपींकडून ४ कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. तर, सोमवारी रात्रीच्या सुमारास १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.
पुण्यात १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी भागात छापा टाकून ५० किलोपेक्षा आधिक मेफेड्रॉन जप्त केलं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो एमडी ड्रग्जची किंमत ही २ कोटी रुपये आहे. आणि या प्रकरणात विशेष म्हणजे कोणाला संशय येऊ नये म्हणून मिठाच्या पॅकेटमध्ये या ड्रग्जची विक्री केली जात होती. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसेच, या घटनेचा ललित पाटील प्रकरणाशी संबध आहे की नाही ? याबाबतदेखील तपास सुरू आहे.