ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रचंड सभेनंतर पुढे काय?
संभाव्य परिणामांची चर्चा करण्यासाठी सभेत झालेल्या प्रमुख मागण्यांचा ऊहापोह करणे रास्त ठरेल…

मनोज जरांगे पाटील यांची सभा रविवारी आंतरवली सराटी गावानजीकच्या रामगव्हाण शिवारात झाली, तिला काही लाखांची गर्दी झाली होती हे लक्षणीय ठरले.
अवघ्या दीड दोन महिन्यांत मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व तयार झाले, हे या सभेने सिद्ध केले. एवढा प्रतिसाद, हेदेखील या सभेच्या परिणामकारकतेची आणि परिणामांचीही चर्चा होण्यासाठी एक महत्त्वाचे कारण ठरते.