राज्यातील खासगी अनुदानित शाळांतील डीएड किंवा बीएड शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी लागू…
अहमदनगर

शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी लागू करावी – शिक्षक भरती संघटनेची मागणी – सुनील गाडगे
राज्यातील खासगी अनुदानित शाळांतील डीएड किंवा बीएड अर्हताधारक शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी लागू करावी यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.
इंग्रजी माध्यमांच्या आकर्षणामुळे मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांचे अतिरिक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अतिरिक्त शिक्षक नवीन शाळेत रुजू झाल्यानंतर मूळ शाळेतील सेवा ज्येष्ठता डावलली जाते.
परिणामी नवीन सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळत नाही. तसेच कमी पायाभूत पदे असलेल्या छोट्या अनुदानित शाळेत मुळातः शिक्षकांची संवर्ग संख्या वरिष्ठ वेतनश्रेणीत २० टक्के पदे उपलब्ध नसतात त्यामुळे तेथील निवडश्रेणी पात्र शिक्षकांना कधीच निवड श्रेणी अनुज्ञेय होत नाही. राज्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो; परंतु शिक्षकांना तो मिळत नाही. म्हणूनच अर्हताधारक शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी लागू करावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने केल्याची माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी दिली.