अहमदनगर महानगरपालिकेच्या अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयमध्ये अंदाधुंद कारभार – दिपाली भोसले
अहमदनगर

अहमदनगर महानगरपालिकेच्या अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय अहमदनगर येथे कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा गहाळ कारभार चालू आहे.
या ठिकाणी नागरिकांनी रेशन कार्ड मध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी, नावे वजा करण्यासाठी, दुबार प्रत साठी दिलेले रेशन कार्ड यासारख्या सुविधांसाठी जमा केलेले रेशन कार्ड यांवर अद्याप कोणत्याही प्रकारचे कार्य झालेले नाही.
येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता अधिकारी रजेवर आहेत. कर्मचारी जेवायला गेलेले आहेत, काही कर्मचारी चहा प्यायला गेलेले आहे असे सांगतात. अरे रा वी ची भाषा करतात . उलट उत्तर देतात. जाब विचारल्यास उडवा उडवीचे उत्तर देतात.
अनेक नागरिकांचे रेशन कार्ड गहाळ झालेले आढळून आले आहेत. अनेक ग्राहक संतप्त प्रक्रिया व्यक्त करत आहेत एक वर्षांपूर्वी दोन वर्षांपूर्वीची प्रकरणे सुद्धा रेंगाळत पडली आहेत.
दिपाली नितीन भोसले यांचे स्वतःचे कुपन यांच्याकडून गहाळ झाले. त्या तिथे उभे राहून त्यांच्या कडून प्रत भरून दुबार प्रत बनवून घेतली. पण अधिकारी सहा महिन्यापासून गैरहजर आहेत . ते सेवेवर आल्यावर त्यांची सही झाल्यावर तुम्हाला कुपन देण्यात येईल असे येथील कर्मचारी सांगत आहेत.
नागरी हक्काने दिपाली मॅडम नी त्यांना प्रश्न केला जर अधिकारी सहा महिन्यांपासून गैरहजर असतील तर मागील महिन्यांच्या कुपन वरती सह्या कोणी केल्या ?? त्या कुपणावरती शिके कोणी दिले ?? तर त्याबद्दल ते समाधानकारक उत्तर देत नाहीत .
ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे तेही कधी त्या ठिकाणी वेळेवर हजर नसतात.
हे वयस्कर आजोबा यांना चुटकी वाजवून यांच्यावर धावून ते बोलत होते.
यांचे कुपन सहा वर्षापासून कार्यालयात जमा आहे. त्यांना फक्त आज उद्या आज उद्या करून चक्र मारायला लावतात.
हे तिथले कर्मचारी यांना दिपाली मॅडम दर दिवस आड भेटतात. कुपनाची विचारणा करतात. हे प्रत्येक वेळेस उडवा उडवीचे उत्तरे देतात .
तिथे सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत. हे कर्मचारी कधीही वेळेवर येत नाहीत. कधी ही जागेवर नसतात.
हा सर्व अहमदनगर मधील अन्नधान्य वितरण कार्यालयात चालू असलेला अंधाधुंद कारभार निदर्शनास दिपाली भोसले मॅडम नी आणून दिला.