ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भारतीय पर्यटन विकास को ऑप सोसायटी कडून पुणे ट्रॅव्हल फेस्टिव्हल चे आयोजन

पुणे

दर वर्षीप्रमाणे भारतीय पर्यटन विकास को ऑप सोसायटी कडून पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल चे आयोजन केले आहे.

आत्ता पर्यंत झालेल्या तिन्ही प्रदर्शनाला पर्यटकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला तसा या चौथ्या प्रदर्शनाला ही मिळेल असे आयोजकाकडून सांगण्यात आले.

उद्या म्हणजेच २ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यटन संचनालय च्या डेप्यूटी डायरेक्टर सौ शमा पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नवचैतन्य हास्य क्लब चे श्री मकरंद टिल्लू, गिरीकंद ट्रॅव्हल चे संचालक श्री अखिलेश जोशी, जॉय अँड क्रू चे संचालक श्री अधिराज , थॉमस कुक चे श्रेयस कर्पे उपस्थित राहणार आहेत.

तीन दिवसाच्या प्रदर्शना दरम्यान गिरिप्रेमी चे उमेश झिरपे तसेच श्री सतीलाल पाटील एव्हरेस्ट मोहिमेच्या आठवणी चर्चासत्राच्या माध्यमातून मांडणार आहेत, तसेच अनेक पर्यंटन स्थळा विषयी तज्ज्ञ मंडळीकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

पीटीएफ ट्रॅव्हेल एक्झिबिशन मध्ये विविध देश विदेशातील सहलींचे पर्याय आणि आकर्षक लकी ड्रॉ देखील असणार आहेत, महाराष्ट्रातील नामांकित ट्रॅव्हेल कंपन्या त्यांचे विविध पर्याय या वेळी उपलब्ध करून देणार आहेत.

प्रदर्शनाचा पुणेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण घोरपडे आणि सचिव श्री सुरेंद्र कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे