ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

व्यावसायिक एलपीजी महागला

हिवाळ्याच्या हंगामात वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींवर परिणाम झाल्याने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

१९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ही वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवीन दर गुरुवारपासून लागू होणार आहेत. गेल्या महिन्यातही तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती १.५० रुपयांनी वाढवल्या होत्या.

दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर तो १७६९.५० रुपयांवर पोहोचला आहे. कोलकातामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १८८७ रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत १७२३.५० रुपये तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १९३७ रुपयांवर पोहोचली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे