ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

भूमिकेतून देशाला सलाम…

मुंबई

देशभक्तीपर कलाकृतींना नेहमीच प्रेक्षकपसंती मिळते. त्यामधील काही कलाकारांनी भूमिकांसाठी विशिष्ट अभ्यास केलेला असतो. या भूमिकेच्या निमित्ताने कलाकारांना जे गवसलं ते त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मांडले आहे.

‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेच्या माध्यमातून पोलिस दलावर भाष्य केलं आहे. या मालिकेत अभिनेता हरिश दुधाडे इन्स्पेक्टर विजय भोसलेच्या भूमिकेत आहे.

‘पूर्वी मला मी खरं बोललो तर समोरचा दुखावला जाईल असा न्यूनगंड होता. पण विजय भोसले ही भूमिका करत असताना तो न्यूनगंड नाहीसा झाला. देशासाठी योगदान देणाऱ्या क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून साकारलेल्या कलाकृतींना प्रेक्षकपसंती मिळते. त्या कलाकृतींमध्ये पोलिस, जिल्हाधिकारी, डॉक्टर अशा भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

काहीतरी वाईट झालं की, पोलिस येतात म्हणून हा सर्वसामान्य माणसांचा गैरसमज मला या भूमिकेतून दूर करता येतो, अनेक पोलिसांचा सकारात्मकरित्या या मालिकेत दिसतो याचा अभिमान आहे’, असं हरीश म्हणाला.

प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधान अमलात आणलं गेलं, घटनेचा स्वीकार केला गेला. विजय भोसलेच्या भूमिकामुळे पोलिसांच्या नजरेतून प्रजासत्ताक दिन बघू शकलो, असंही त्यांनं नमूद केलं.

‘मुंबई डायरी’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनं एका डॉक्टरची भूमिका निभावली आहे.

मी थेट देशसेवा करत नसले तरी अशा प्रकारच्या व्यक्तिरेखेतून देशाला सलाम करता येतो. इतर वेळी आपल्याला डॉक्टरांच्या आयुष्याची एकच बाजू दिसते. पण व्यवसायासाठी आपली वैयक्तिक सुख- दुःख बाजूला ठेवून ते झटत असतात. मुंबई कुठल्याही कठीण प्रसंगातून गेली.

की, आपण ‘मुंबई स्पिरीट’ असं अगदी सहज म्हणून जातो. पण या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी म्हणेन हे ‘नेशन स्पिरीट’ आहे. भारत अनेक संकटांमधून गेला आहे आणि आज एक बलशाली देश म्हणून दिमाखात उभा आहे, याचा एक भारतीय म्हणून अभिमान आहे,’ असं मृण्मयी म्हणाली.

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत अप्पीची भूमिका साकारणाऱ्या शिवानी नाईक हिनं सांगितलं,

मोठ्या पदावर गेल्यावरसुद्धा आपल्या मुळाशी घट्ट नातं ठेवण्याची शिकवण मला मालिकेतून मिळाली. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी मी व्यवस्थेचा भाग झाले. यात एका भागात मोठ्या पदावरच्या भ्रष्टाचारी व्यक्तीकडून झेंडावंदन करून घेण्यापेक्षा मी एका कष्टकरी महिलेकडून ते करून घेते असं दाखवलंय.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हा संदेश मला मोठा वाटतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे