ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

निवडणुकांवर बहिष्कार, मराठा आंदोलक संतापले

मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची झळ आता राजकीय नेत्यांना देखील बसू लागली आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून जालन्यातील २५० गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला आहे.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात येऊ देणार नाही, असा इशाराही गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे. यामुळे राजकीय नेत्यांची मोठी कोंडी होत असून त्यांना मोठा मनस्तापही सहन करावा लागत आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप आमदार नारायण कुचे, आमदार बबनराव लोणीकर, आणि पालकमंत्री अतुल सावे, यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न झाला आहे.

इतकंच नाही, रावसाहेब दानवे यांच्या कन्या आशा पांडे यांचाही एक राजकीय कार्यक्रम मराठा आंदोलकांनी उधळून लावल्याची माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण केलं होतं. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.एक महिन्याचा वेळ द्या आम्ही आरक्षणाचा निर्णय घेऊ, असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं. त्यानुसार, जरांगे यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.

आता हा अल्टिमेटम संपत आला आहे. दरम्यान, ४० दिवसांची मुदत देऊन सुद्धा सरकारने आरक्षणासाठी ठोस पाऊलं उचलली नसल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे