शतक महोत्सव साजरा करत असलेल्या ‘श्री मार्कंडेय मंदिरम’ च्या जीर्णोद्धाराचा समाजाकडून निर्धार
अहमदनगर प्रतिनिधी

पद्मशाली समाजाचा मोठा निर्णय आणि देणग्यांचा ओघ सुरू
येथील गांधी मैदानातील श्री मार्कंडेय मंदिरम म्हणजे ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या वास्तू वैभवात भर घालणारे, उत्तम वास्तुकलेचा नमुना असणारे पद्मशाली समाजाचे शक्तीस्थान. या मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भात नुकतीच सर्व समाज बांधवांची एक बैठक मंदिरात पार पडली. ज्यात शताब्दी साजरा करणाऱ्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
“19 व्या शतकात इथल्या समाज धुरणींनी काबाडकष्ट करून समाजाचे आराध्य दैवत मार्कंडेय महामुनींच्या मंदिरासाठीची जागा खरेदी केली व मंदिर उभारणी केली. 1922 झाली मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन कलशारोहण व महामुनींची मूर्ती प्रतिष्ठापणा करण्यात आली.
यंदाचे 2022-23 हे मंदिराच्या शताब्दीचे वर्ष, नारळी पौर्णिमा, श्री मार्कंडेय महामुनी जयंती, गजानन महाराज जन्मोत्सव असे विविध सोहळे मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
विजयादशमीच्या सीमोल्लंघनासाठी ही समाज मोठ्या प्रमाणात मंदिरात एकत्र येतो. अश्या या शंभर वर्षांचा गौरवशाली इतिहास आसणाऱ्या मंदिराची वास्तू गेल्या काही वर्षात जीर्ण व अत्यंत कमकुवत झाली आहे. नुकत्याच नारळी पौर्णिमा उत्सवाच्या दिवशीच सभामंडपातील एक कोपऱ्याचा स्लॅब कोसळला, पण मार्कंडेय महामुनींच्या कृपेने कोणालाही कसलीही इजा झाली नाही. ही बाब लक्ष्यात घेता मंदीराच्या जीर्णोद्धाराची वेळ आलेली आहे.
शताब्दी महोत्सव साजरा करत असतांनाच भव्य दिव्य अश्या श्री मार्कंडेय मंदिरांची पायाभरणी समारंभ ही आपण घ्यायला हवा…!!” असे श्री मार्कंडेय देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम म्हणाले. ते पद्मशाली समाजाच्या वतीने आयोजित मंदिर जीर्णोद्धार समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत व श्री मार्कंडेय महामुनींच्या साक्षीने मंदिर जीर्णोद्धाराचा निर्णय एकमताने घेण्यात आला, त्यासाठीची कार्यवाही ही तात्काळ सुरू करण्याचे ठरवण्यात आले.
आपल्या पूर्वजांनी या शहरामध्ये आपल्या हक्काचे देवस्थान असावे या उद्देशाने शंभर वर्षांपूर्वी इतकी देखणी वास्तू उभी केली आहे. हे मंदिर म्हणजे पद्मशाली समाजाची आस्था आणि अस्मिता आहे. आपल्या समाज धुरणींनी हा वसा आपल्या हातात दिला होता, पुढच्या पिढी पर्यंत तो पोहचवण्याची जबाबदारी आपली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पुन्हा एकदा असेच सुंदर मंदिर उभे राहणे ही काळाची गरज आहे. तेव्हा या मंदिर उभारणीच्या कामात खारीचा वाटा म्हणून मी माझ्या कुटूंबियांच्या वतीने एकांवन्न हजार रुपये रोख देणगी देत आहे…!!
असे रोख देणगी मंदिर कमिटीकडे सुपूर्द करतांना राजू बोगा म्हणाले. यावेळी मनोज दुलम, श्रीनिवास बोज्जा, रवी दंडी, हरिभाऊ येलदंडी, गोविंद आडम, अंबादास गोटीपामुल, विष्णू सब्बन, रमेश इगे, हर्षद चिल्का आदी समाज बांधवांनी रोख देणगीची तर बालाजी मंदिर ट्रस्ट, एकदंत मंदिर ट्रस्ट, महापद्मसेना, श्रीकांत छिंदम, राजू म्याना, गणेश चेंनूर समाज बांधवांनी मंदीर जीर्णोद्धारासाठी लागणाऱ्या विविध साहित्य देणगी रुपात देण्याची घोषणा केली.
यावेळी बोगा कुटुंबातील विनोद बोगा, संजय बोगा ,प्रणव बोगा ,प्रथमेश बोगा यांच्यासह मार्कंडेय मंदिर कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम, पंच कमिटीचे अध्यक्ष संजय वल्लाकट्टी, श्रीकांत छिंदम , त्रिलेश येनगंदुल, राजेंद्र म्याना, महेंद्र बिज्जा ,अजय गुरुड, अजय लयशेटी ,प्रकाश कोटा ,श्रीनिवास वंगारी ,शंकर जिंदम, सागर सब्बन, शिवाजी संदूपटला, शंकर नक्का, कृष्णा सांभार, रवि दंडी, रमेश कोंडा, व्यंकटेश नक्का आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.
सूत्रसंचालन कृष्णा संभार यांनी केले तर आभार कुमार शेठ आडेप यांनी मानले.