ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये नामांकित शाळेतच अल्पवयीन धर्मांतराचा प्रयत्न ?

आमदार संग्राम जगताप यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलींना सोशल मिडीयाद्वारे लव जिहादमध्ये फसवणे, त्यांचे वशीकरण करणे आणि गुप्त नात्यांत ओढणे या प्रकारची चौकशी करण्याची पालकांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी. जिहादी मुस्लिम महिला शिक्षकाकडून शालेय अल्पवयीन विद्यार्थ्यांना धर्मांतराबाबतचा प्रकार उघड..

शहरातील एका खाजगी शिक्षण संस्थेतील मुस्लिम महिला शिक्षिकाकडून विद्यार्थ्यांना धर्मांतराबाबतचे धडे देत असून तिचे इंटरनॅशनल कॉल उघडकीस आले असून त्या महिलेवर फिर्याद दाखल झाली असून येत्या पाच दिवसांमध्ये कडक कारवाई करून अटक न केल्यास तीव्र स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल संस्था चालकांनी देखील जहादी प्रवृत्तीच्या महिला शिक्षकांना शाळेमध्ये ठेवू नये, लहान मुलांच्या मनावर धर्मांतराबाबत शिकवले जाते हा गंभीर प्रकार असून पालकांनी पुढे येऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल करावे, यांना धडा शिकवण्याचे काम आपण करू हा प्रकार गंभीर असून पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, दत्ता खैरे, विशाल पवार, डॉक्टर राहुल मुथा, अनंत शेळके, रमेश गांधी, अमोल देडगावकर, मेहुल शहा, परेश लोढा, दिनेश चोपडा, ओंकार घोलप आदी उपस्थित होते.

निवेदनात पुढे म्हणले आहे की, शहरातील एका खाजगी नामांकित शाळेत ९ वी मध्ये शिकणारी १३ वर्षांची अल्पवयीन मुलीला त्या शाळेतील नूर मॅडम या मुस्लीम महिला शिक्षिकेने विश्वासात घेवून तीला जादू टोण्यासारखा प्रकार करून लव जिहाद या मध्ये अडकवण्याचा प्रकार केलेला समोर आलेला आहे.

या शिक्षिकेने मुलीस एक काम सांगितले नंतर दुस-या दिवशी तिला विश्वासात घेवून तिची घ रची माहिती काढली, घरात कोण कोण राहत, घरचा व्यावसाय काय आहे परिस्थिती कशी आहे. आई वडिलांसोबत मुलीचे संबंध कसे आहेत याची सखोल माहिती मिळवली. मुलगी एकुलती एक आहे समजल्यावर दुस-या दिवशी रॅपर नसलेले चॉकलेट तिला खायला दिले.

त्यानंतर मुलीला २३ दिवसानंतर उलट्या झाल्या, गुंगी आली आणि त्याच्या दुस-या दिवशीपासून मुलगी मॅडमकडे इस्लामची मजहबनी माहिती घ्यायला लागली, मला नमाज पढायला शिकवा अशी मागणी ती मुलगी त्या शिक्षिकेकडे करायला लागली.

यानंतर या नूर मॅडमने मुलीला इंस्टाग्रामचा आयडी ओपन करून दिला एका मुस्तकिन तांबोळी नावाच्या मुस्लीम मुलाशी ओळख करून दिली आणि मुलीच्या परवानगी शिवाय तीचा मोबाईल नंबर त्या मुलाला दिला, तुमचे बहिण भावाचे नाते आहे असे मुलीला सांगून त्यांच्यात नातेसंबंध बनवून दिले. काही दिवसानंतर त्या मुलामार्फत “हमारे में सब चलता हे” असे बोलून तीच्याशी जवळीक करून संबंध बनवून तीच्याशी रिलेशनशिप मध्ये आला. इतक्यावरच न थांबता या मुलाने इतर २५ अल्पवयीन मुलांशी संबंध जुळवून दिले तीच्या इंस्टाग्रामला ते जोडून दिलेले आहेत.

काळीजादू वशीकरण प्रकारामध्ये या मुलीस २ अत्तराच्या बाटल्या एक घरात ठेवण्यासाठी व एक सोबत ठेवण्यासाठी देण्यात आल्या. खडीसाखर सारख्या दिसणा-या गोळया तसेच पॅरासिटेमोल च्या १०० गोळ्या खायला दिल्या, एक चावी देण्यात आली. तीला आईवडिलांचा राग आल्यावर ही चावी हातात घ्यायची असे सांगण्यात आले. तीला दोन काळे बॉल, २ नाणे देवून तीला तिच्या वडीलाच्या तिजोरीत ते ठेवण्यास सांगितले, एक माळ, दोन अंगठ्या, गोंडा लावलेला एक पेन दिला. काळी जादू करून या गोष्टी तीला दिल्या गेल्या.

अतिशय गंभीर स्वरूपाचा प्रकार घडलेला आहे. असून हा प्रकार पालकांना कळल्यानंतर त्यांनी तो प्रकार समाजापुढे आणला..

अशा प्रकारे या व अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांमध्ये अशा प्रकारचे गंभीर प्रकार चालू आहेत व अल्पवयीन हिंदू मुलींवर शाळेतील मुस्लीम शिक्षिकेमार्फत अशा प्रकारचे प्रयोग चालू आहेत.

आमची सर्व पालकांतर्फे आपणास मागणी आहे की हा अतिशय गंभीर प्रकार असून या बाबत सदर शाळेतील नूर मॅडम व तीला सहकार्य करणा-या इतर शिक्षकांची सखोल चौकशी करण्यात यावी व यामार्फत अजून किती मुलींना या प्रकारामध्ये अडकवलेले आहे तसेच हे करण्यामागे अजून कोण कोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे व हे रॅकेट उघडकीस आणून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे