ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

‘हा’ एकच परफेक्ट उपाय करा आणि मुलांचा हट्टीपणा थांबवा, मुलांच्या स्वभावात देखील होईल बदल

अहमदनगर

प्रत्येक घरामध्ये लहान लहान मुले असतात. जेव्हा त्यांना थोडे कळायला लागते तेव्हा बरीच मुले काही गोष्टींसाठी हट्टीपणा करताना आपल्याला दिसून येतात. त्यांना बाहेर कुठे घेऊन गेले व त्यांना जर एखादी वस्तू आवडली तर ती घेण्यासाठी त्यांचा होणारा आकांडतांडव पाहून आपल्याला काय करावे हे त्यावेळेस अजिबात सुचत नाही. प्रत्येकच मुलांच्या बऱ्याच बाबतीत हट्टीपणा असतोच असतो.

बऱ्याचदा लहान मुलांच्या हट्टीपणामुळे पालकांचा संयम सुटतो व कधीकधी पालक देखील मोठमोठ्याने मुलांवर ओरडायला लागतात. असे केल्याने बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की मुलांचा हट्टीपणा कमी होण्याऐवजी ते जास्तच प्रमाणात हट्ट धरायला लागतात. तसेच बरीच मुलं काही झाले की उलट उत्तर देतात.

हट्ट करताना किंवा अशा पद्धतीने वागताना मुलांचा आवाज बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो अशा परिस्थितीत मुलांना शांत करणे खूप कठीण होऊन बसते. परंतु जर याबाबतीत आपण पाहिले तर एक अगदी छानसा आणि छोटासा उपाय जर पालकांनी केला तर मुलं ऑटोमॅटिक शांत होतील व त्यांचा हट्टीपणा देखील कमी होईल.

याच बाबतीतली माहिती आपण या लेखात बघणार आहोत. याबाबतची माहिती momharshasays नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेली आहे. या पेजवर त्याच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती पालकांसाठी खूप फायद्याची ठरू शकते.

काय सांगितलं आहे इंस्टाग्रामवरील या व्हिडिओत?

इंस्टाग्राम वरील या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, जेव्हा मुले चिडतात आणि मोठमोठ्याने ओरडायला लागतात तेव्हा त्यांच्यावर पालकांनी न ओरडता त्यांना शांतपणे उत्तर देणे गरजेचे आहे. मुलांनी अशा प्रसंगी कितीही प्रमाणामध्ये आवाज वाढवला तरी पालकांनी आवाज वाढू न देणे हिताचे ठरते.

तसेच मुलांशी बोलताना तुम्हाला राग आला आहे किंवा तुम्ही चिडले आहात हे त्यांना अजिबात कळू किंवा जाणवू देऊ नका. जेव्हा मुलांशी तुम्ही शांतपणे बोलाल तेव्हा तुमच्या आवाजातील जो काही हळुवारपणा असतो तो मुलांना आपोआप शांत करण्यास मदत करतो. अशा पद्धतीचा साधा आणि सोपा उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेला असल्यामुळे तो करून पाहिला देखील काही हरकत नाही.

बऱ्याचदा मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीचा किंवा लोकांच्या वागण्याचा व बोलण्याचा प्रभाव त्यांच्यावर होत असतो. आपल्या घरातील आजी आजोबा असो किंवा पालक किंवा मित्र-मैत्रिणी ज्या शब्दांमध्ये बोलतात तसेच मुलं बोलतात व त्या पद्धतीचाच परिणाम त्यांच्यावर होत असतो.

त्यामुळे अशा प्रसंगी मुलांसमोर शक्यतो न चिडणे हेच फायद्याचे ठरते. तुम्ही मुलांशी जर ओरडून बोलला नाहीत व मुलं कितीही ओरडली तर शांतपणे त्यांच्याशी तुम्ही बोललात तर मुलांच्या बोलण्यामध्ये नक्कीच फरक आढळून येईल असे देखील या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे