अहमदनगर चे देवदत्त प्रविण गुंडू यांना मिस्टर परफेक्शन,सुपर माॅडेल, बेस्ट ॲट्राक्टिव्ह पर्सनालिटी २०२३ अवाॅर्ड मिळाला
अहमदनगर

अहमदनगर मधील श्री. प्रविण गुंडू – प्रसिद्ध गुंडू बाजार मेडिकल चे मालक , व काका श्री. प्रमोद गुंडू – S.S. मोबाईल चे मालक यांचा मुलगा देवदत्त प्रविण गुंडू यांना नुकताच मिस्टर आशिया सुपर माॅडेल २०२३ काॅम्पिटीशन, सब टायटल विजेते मिस्टर ॲट्राक्टिव्ह पर्सनालिटी २०२३ बेस्ट ॲट्राक्टिव्ह पर्सनालिटी २०२३ अवाॅर्ड मिळाला.
तसेच नोएडा दिल्ली येथे एशिया सुपर माॅडेल अवाॅर्ड मिळाला.
देवदत्त यांचे ग्रॅजुएशन फार्मसिस्ट मध्ये पुर्ण झाले आहे. पण त्यांचा एक छंद होता तसेच एक आवड होती रॅमवाॅक, फिटनेस ट्रेनर. त्यासाठी त्यांनी बलसागर जिम मधील सुरपुर्या सरांकडून मोटीव्हेशन आणि पुर्ण सपोर्ट मिळाला. त्यांच्या सपोर्ट मुळे भारत सरकारचे फिटनेस ट्रेनर असे पहिले सर्टिफिकेट देवदत्त ला मिळाले.
त्यानंतर मुंबई मधील प्रसिद्ध K 11 नॅशनल, इंटरनॅशनल ॲकॅडमी मध्ये ट्रेनिंग चे शिक्षण घेतले. त्या सोबतच मुंबई मधील सुप्रसिद्ध ND जिम नायट्रो जिम येथे जिम ट्रेनर म्हणून जाॅईन केले. हा देवदत्त यांचा पहिला अनुभव होता.
अहमदनगर मध्ये ५,६ जिम मध्ये सध्या फ्रिलान्सर म्हणून गेले ८ वर्षांपासून काम करत आहे. देवदत्त यांचे काम पाहुन अहमदनगर क्लब यांनी पर्सनल ट्रेनर म्हणून निवड केली.
देवदत्त यांनी मिस्टर परफेक्शन या स्पर्धेसाठी खुप मेहनत घेतली. स्वतः चे क्लाईंट शेड्युल सांभाळून फक्त २ तास झोप घेऊन या स्पर्धेसाठी तयारी केली. देवदत्त स्वतः पावर लिफ्टिंग मध्ये ३,४ लेवल पर्यंत गेले आहेत.
देवदत्त हे बाॅडी कन्सल्टिंग, फुड्स सप्लीमेंट गायडन्स,३० दिवसांमध्ये वेट लॉस प्रोग्रॅम, वेट गेन, मसल्स बिल्डर, संपूर्ण लेडीज, जेन्टस वर्क प्रोग्रॅम असे जिम ट्रेनर ची कामे करतात. अशा या देवदत्त गुंडू यांना घरातुन खुप सपोर्ट मिळतोय. आणि काही गायडन्स सुध्दा तसेच सर्व समाजाकडून, मित्र परिवार, नातेवाईक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.