महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा माती पूजन सोहळा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न
अहिल्यानगर

अहिल्यानगरला कुस्तीची वैभवशाली मोठी परंपरा आहे. त्यामुळे येथील मैदानावर ही स्पर्धा होणे हे आनंदाची बाब आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलम्पिक कुस्ती स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते.
त्यावेळेस कुस्तीला सोन्याचे दिवस होते.मात्र आता हे वलय कमी होत आहे.त्यामुळे कुस्तीला पुनर्वैभव प्राप्त व्हावे यासाठीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीरकर संघ स्थापन होऊन गेल्या ६७ वर्षापासून प्रयत्नशील आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माध्यमातून देशात नेतृत्व करणारे खेळाडू निर्माण करायचे आहेत. नगरची स्पर्धा कुस्तीची लोकप्रियता वाढवेल असेच यशस्वी नियोजन आ.संग्राम जगताप करतील.यासाठीच नगरला यजमानपद दिले आहे.असे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
येत्या २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगर मध्ये होणाऱ्या ६७ व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धेच्या मातीचे पूजन आज केंद्रीय मंत्री मुरलीधर माहोळ यांच्या हस्ते वाडियापार्क येथे उभारण्यात आलेल्या स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी येथे मातिपूजन सोहळा शेकडो कुस्ती प्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस,सरचिटणीस हिंदकेसरी योगेश दोडके,कार्याध्यक्ष पै. संदिप भोंडवे,माजी आमदार अरुण जगताप,आमदार शिवाजी कर्डिले,स्पर्धेचे संयोजक आमदार संग्राम जगताप,उपाध्यक्ष पै. अर्जुन शेळके,महाराष्ट्र केसरी पै. अशोक शिर्के,महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे,सचिव प्रा.डॉ.पै. संतोष भुजबळ,सहसचिव पै. प्रविण घुले आदींसह सर्व पदाधिकारी,शहर व जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी यांच्या उपस्थित होते.