
सरकारी पातळीवर अद्याप मराठा आरक्षणावर ठोस असा निर्णय घेण्यात आलेला नाही.यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील बुरुडगाव ग्रामपंचायतीने मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात उडी घेतली आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचासह सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे.
बुरूडगाव ग्रामपंचायतीने देखील जरांगे पाटलांच्या लढाईला पाठींबा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.ग्रामपंचायतीतील 11 पैकी 9 सदस्यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यात लोकनियुक्त सरपंचाचाही सहभाग आहे.
राजीनामा दिलेल्यांमध्ये सरपंच अर्चना कुलट,उपसरपंच महेश निमसे, सदस्य सिराज शेख, खंडू काळे, ज्योती कर्डिले,अक्षय चव्हाण, नयना दरंदले, शीतल ढमढेरे, रुख्मिणी जाधव, रंजना कुलट यांचा समावेश आहे.