
पाथर्डी शहरातील आनंदनगर व विजयनगर, या भागात चिकन गुनिया सदृश साथ रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, दिवसेंदिवस या आजाराचे रुग्ण वाढत आहेत.
यापूर्वी शहरात गोचीड ताप, डेंग्यू, अशा साथीचा प्रादुर्भाव झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात विविध साथ रोगांचे रुग्ण वाढण्याची शक्यता शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.
याबाबत माजी नगरसेवक तथा प्रथित यश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दीपक देशमुख म्हणाले, शहरात गोचीड ताप व डेंग्यूची साथ फैलावत असून, उपनगरांमध्ये चिकनगुनिया सदृश आजाराचे रुग्ण आढळत आहेत.
शहराच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत आपण पालिकेकडे लवकरच सामूहिक स्वरूपात फवारणी धुरळणी व डास प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी करणार आहोत. दिवाळी सणामुळे बाजारात नागरिकांची खेदीसाठी वर्दळ वाढत आहे.
चिकुनगुनिया रुग्णाच्या संपर्कात अन्य नागरिक आल्यास त्यालाही आजाराचा धोका वाढतो. याबाबत पालिकेने गांभीर्याने घेऊन तातडीने प्रभागनिहाय धुरळणी व फवारणी करण्याची गरज आहे. व्यावसायिक व डॉक्टरांची तातडीने बैठक घेऊन पालिका प्रशासनाने उपाययोजनांबाबत उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.
शहरात लंपीग्रस्त जनावरे व स्वाईन फीवर आजाराने डुकरे मरण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रमाण वाढत आहे. सणासुदीच्या दिवसांत कचऱ्याचे मोठया प्रमाणात वाढते, हा कचरा वेळेवर उचलला जात नाही. स्त्यावरून वाहणारे गटारीचे पाणी, टपऱ्या व हॉटेलमधील घाण पाणी, या भोवती थांबणारी डुकरे,अशा वातावरणात साथरोगाचा उद्रेक वाढू शकतो. पालिकेने शहरातील डॉक्टर्स स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, गणेश मंडळे, व्यापाऱ्यांची बैठक घेऊन साथरोग निर्मूलनाबाबत उपाययोजना करण्याची मागणी डॉ. देशमुख यांनी केली आहे.