ब्रेकिंगमहाराष्ट्र
उपचारासाठी मुलीने पुण्याला नेले होते,नगरला येताना दोघांनी तिची हत्या केली.
अहमदनगर - मृत रेखा जरेंच्या आईला साक्ष देताना कोर्टात अश्रू अनावर

माझे गुडघे दुखत असल्याने मुलगीरेखा जरे हिने पुण्याला डॉक्टरकडे नेले होते. आमच्या समवेत विजयमाला मानेव कुणाल जरे होते. परत येतअसताना शिरूर बायपासजवळ एकाटेम्पोने कट मारल्याने आमच्या गाडीचा पत्रा तुटला. त्यानंतर जातेगाव घाटात दुचाकीवरील दोघांनी आमच्या कारला कट मारलाव रेखाशी वाद घातला आणि चाकूचा वार करून तिची हत्या केली.