
रमजान महिन्याचा अंतिम पर्वास सुरुवात झाली आहे. गुरुवारी हा सण शहरात व उपनगरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात नवे कपडे खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी होत आहे.
ही गर्दी उशिरापर्यंत असते. सणानिमित्त पठाणी वेशभूषा, कुर्ता, लहान मुलांचे कपडे व महिलांकडून रेडिमेड ड्रेस व साड्यांना पसंती दिली जात आहे.