ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राम मंदिर उद्घाटन सोहळा…सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धी सुट्टी जाहीर

अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्यामुळे देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये २२ जानेवारी रोजी अर्ध्या दिवसासाठी बंद राहणार आहेत. कार्मिक मंत्रालयाने गुरुवारी एका आदेशात ही माहिती दिली.

राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाच्या नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे. ‘‘अयोध्येतील राम लल्लाचा अभिषेक सोहळा २२ जानेवारी रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जाईल. कर्मचाऱ्यांना या उत्सवात सहभागी होण्यासाठी सक्षम करण्यासाठी, भारतभरातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्याोगिक आस्थापने २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे केंद्र सरकारची सर्व मंत्रालये, विभागांना जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे