ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्र

यंदाच्या हंगामातील आंब्याची पहिली पेटी पुण्यात दाखल

पुणे

पावस भागातील शेतकरी सुनील यांनी मार्केट यार्ड मधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर हा रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आली होती. बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्याने ही मानाची पेटी विकत घेतली.

पुण्यात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. तर पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत २१ हजार रुपये इतकी आहे. आंबा हे फळ सर्वांचेच आवडते आहे. याला फळांचा राजा म्हणतात. पिकलेला आंबा एप्रिल मध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो.

पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आज दाखल झाली या पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत २१ हजार रुपये होती.

पुण्यातील मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला असून त्याची विधीवत पूजा आज पार पडली आहे. यंदा एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली असून आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे.

आज विधिवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करत पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पहिल्या पेटीचा लिलाव देखील पार पडला आहे. या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी २१ हजार रुपयांना विकली गेली आहे. बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्याने ही मानाची पेटी विकत घेतली असून या पेटीमध्ये चार डझन आंबे आहेत. पावस भागातील शेतकरी सुनील यांनी मार्केट यार्ड मधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर हा रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे