ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

नरेंद्र मोदी २४ साली पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करतील – खा.सुजय विखे

अहमदनगर

तीन राज्यातील विजयाचा भाजपचा सावेडीत जल्लोष

चार पैकी तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मिदींच्या नेतृत्वाला जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय स्पष्ट संकेत आहे कि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए ३५० हून अधिक जागा जिंकून नरेंद्र मोदी २०२४ साली पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करतील हे आज सिद्ध झाले आहे.

सर्व विरोध गेल्या अनेक दिवसापासून छातीठोकपने जे पंतप्रधान नरेद्र मोदींबद्दल वाईट बोलत होते त्यांना जनतेच चोख उत्तर दिले आहे. आतातरी त्यांनी मिडिया समोर न येत जनतेत जाऊन झालेल्या चुका सुधाराव्यात, अन्यथा २०२४ साली होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणर नाही. तीन राज्यात मिळालेल्या विजयाचा जल्लोष नगर शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सावेडीत साजरा केला आहे, असे प्रतिपादन खा.डॉ.सुजय विखे यांनी केले.

राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तिसगढ विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या निर्विवाद बहुमताचा जल्लोष सावेडीत नगर विधानसभा प्रमुख महेंद्रभैय्या गंधे यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आला. ढोल, फटाके वाजवून व पेढे वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी खा.सुजय विखे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी महेंद्रभैय्या गंधे, ज्ञानेश्वर काळे, संगीता खरमाळे, बाबासाहेब सानप, तुषार पोटे, रेखा विधाते, संतोष गांधी, राजू मंगलारप, गोकुळ काळे, संजय ढोणे, प्रताप परदेशी, मनोज दुल्लम आदींसह मोठ्या संख्यने पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महेंद्र गंधे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने तीन राज्यांमध्ये बहुमत मिळवून जनतेचा विश्वास भाजपवारच आहे हे सिद्ध केले आहे.

या विजयामुळे लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल आम्ही जिंकली आहे. आता २०२४ साली होणारी फायनलही आम्हीच जिंकू व नगरमधून डॉ.सुजय विखे यांना पुन्हा खासदार करू.

यावेळी कुसूम शेलार, अशोक जोशी, संपत नलावडे, अविनाश साखला, सचिन कुसळकर, नितीन जोशी, सुमित बटोळे, श्रीकांत फंड, ओम काळे, चंद्रकांत पाटोळे, विशाल खैरे, बल्लू सचदेव, सतीश शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे