ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगसामाजिक

भारतीय सिंधू सभा आयोजित ‘सिंधियत जो सफरनामो’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

अहमदनगर

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी मुंबई व भारतीय सिंधू सभा नगर शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सिंधीयत जो सफरनामो-2023’ हा सांस्कृतिक कार्यक्रम हजारो सिंधी समाज बांधवांच्या उपस्थितीत सावेडी रोडवरील वृंदावन लॉन्स येथे नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

सिंधी समाजाची सभ्यता, संस्कृतीचे, परंपराचे सुंदर सादरीकरण, गीत, नृत्य, नाटिकाच्या माध्यमातून स्थानिक सिंधी महिला मंडळांनी उत्कृष्टपणे सादर करुन उपस्थितांची वाह वाह मिळविली. तसेच याप्रसंगी लहान मुलांच्या विविध खेळ, स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात मोठ्या संख्येने मुले-मुली सहभागी झाली होती.

मा सिंधीयाणी ग्रुप 

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, भेटवस्तू देण्यात आल्या व महिलांसाठी पाककला स्पर्धा, मेहंदी, रांगोळी व नेल आर्ट स्पर्धा घेण्यात आल्या. उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या विजेत्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.

सदर कार्यक्रमांसाठी भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दादा लधाराम नागवाणी, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी, भारतीय सिंधू सभाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश हेमनानी यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.

पाहुण्यांचा सत्कार भारतीय सिंधू सभाचे जिल्हाध्यक्ष दामोदर बठेजा यांनी केला.

नगर शहरातील तीन तरुणांनी सिंधी समाजाची शान देशभरात वाढविली यात सीए शंकर अंदानी यांना अनेक जागतिक तसेच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले असून, नुकताच भारतीय पोस्टाने त्यांचे पाच रुपयांचे तिकिट प्रकाशित केले आहे. येथील सायकलपटू चेतन नवलानी यांनी लेह-लडाख येथील खारदुंगा ला चॅलेंज ही सुमारे 18 हजार फूट उंच अल्ट्रा मॅरेथॉन पार केली. तसेच जतिन डेंबला यांनी लडाख येथील 6250 मी. उंचीच्या मेंटॉक काँग्री ही गिर्यारोहण मोहिम यशस्वीरित्य फत्ते केली. या तिघांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अचानक आलेल्या पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने सिंधी समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेत खाद्यपेय स्टॉल्सवरील विविध चविष्ट पदार्थाचे आस्वाद घेण्यात गप्पा, हास्य विनोदात सर्वजण दंग झाले होते. यावेळी पपेट शो, तंबोला सह विविध मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश कुकरेजा, किशन पंजवानी, द्वारका किंगर, किशोर रंगलानी, जितेश सचदेव, सागर बठेजा, राहुल बजाज, मुकेश आसनानी, अशोक आहुजा, मोती आहुजा, मन्नू कुकरेजा, गोपाल भागवाणी आदिंसह भारतीय सिंधू सभेच्या कार्यकारिणी सदस्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

प्रास्तविक जितेश सचदेव यांनी केले तर दामोदर बठेजा यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे