ब्रेकिंगमहाराष्ट्र
मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा इतक्या टक्क्यांनी वाढवणार
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची तयारी झालीय. बिहारच्या धर्तीवर आरक्षणाची मर्यादा वाढवणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठा आरक्षणाचा तोडगा अगदी अंतिम टप्प्यात आलाय. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्यातील शिंदे सरकार लवकरच मोठा निर्णय घेणाराय.
नागपूरला होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचा ऐतिहासिक ठराव मांडला जाणार आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करतंय.
आरक्षणाचा ‘बिहार पॅटर्न’
बिहारमध्ये सध्या अनुसूचित जातीसाठी – 20 %, अनुसूचित जमातीसाठी – 2 %, मागास वर्गासाठी – 18 %, अत्यंत मागास वर्गासाठी – 25 % आणि आर्थिक मागास वर्गासाठी – 10 % असं एकूण 75 % आरक्षण देण्यात आलंय.
आता राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर असाच फॉर्म्युला महाराष्ट्रातही राबवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.