मोदी केवळ देशाचीच नव्हे तर जगाची गरज – मंत्री चंद्रकांत पाटील
सांगलीत लोकसेवा विश्वस्त संस्थेच्यावतीने आयोजित उद्यम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाच्या नेत्या नीता केळकर यांनी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

नरेंद्र मोदी निवडून येणे ही केवळ देशाचीच नव्हे तर जगाची गरज आहे. जगात सुरू असलेल्या युद्धामध्ये मोदींच्यामुळे तीन दिवस युद्धविराम मिळाला. मात्र, काही मंडळी सूर्य झाकण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या गाडीला चालकच नाही असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीत व्यक्त केले.
सांगलीत लोकसेवा विश्वस्त संस्थेच्यावतीने आयोजित उद्यम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाच्या नेत्या नीता केळकर यांनी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माध्यम प्रतिनिधीशी मंत्री पाटील यांनी संवाद साधला. ते म्हणाले, सुर्याला झाकता येत नाही. मात्र, काही मंडळी झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या ट्रेनमध्ये अनेक लोक गर्दी करीत असले तरी त्यांच्या ट्रेनला चालकच नाही.
राज्यात उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाल्यानंतर तुमचे महत्व कमी झाले आहे का असे विचारले असता, मी एक कोरे पाकीट असून पक्ष, संघटना त्याच्यावर कोणता पत्ता देईल त्या ठिकाणी जायचे एवढेच माझे काम आहे.
पक्षात एक शिस्त असल्याने पक्ष फुटीचा प्रसंग कधीच भाजपावर आलेला नाही. काही मंडळी नाराज होऊन बाजूला गेली असली तरी त्याचा पक्षावर काहीच परिणाम होत नाही.