ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुरळक फेऱ्या वगळता नगर जिल्ह्यातील बससेवा बंद, तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर महामंडळाचा निर्णय
अहमदनगर

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोडीच्या घटना होत असल्याने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील बहुतांश बस बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मंगळवारी ८० टक्के फेऱ्या बंद होत्या.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा तसेच राज्यातील काही भागांत एसटीवर दगडफेक करण्यात आली. तर काही ठिकाणी महामार्गावर आंदोलन सुरू असल्याने एसटीच्या फेऱ्या करण्यात अडचणी येत आहेत.
सोमवारी केवळ बीड जिल्ह्यात जाणाऱ्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु, त्यानंतरही अनेक ठिकाणी तोडफोड झाल्याने खबरदारी म्हणून एसटीच्या अहमदनगर विभागीय कार्यालयाने मंगळवारी बहुतांश ठिकाणच्या फेऱ्या रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.