ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वैष्णवी दिपक रामदिन चे एक आगळेवेगळे अरंगेत्रम पुण्यात सादर

पुणे - कु.वैष्णवी ही स्नेहालयाचे कार्यकर्ते श्री दीपक रामदिन यांची कन्या आहे.

वैष्णवी दिपक रामदिन चे एक आगळेवेगळे अरंगेत्रम पुण्यात सादर होत आहे .‘नृत्यप्रेरणा’ आंतरराष्ट्रीय नृत्य शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी रामदिन हिचे अरंगेत्रम व नृत्यशाळेचे 40 व्या पदार्पण असा दुग्धशर्करा योग 7 एप्रिल रोजी होत आहे.

या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनात मूक ,बधिर व्यक्तिंना नृत्यांगना प्रत्येक मुद्रा, कृती, नृत्यातील कथा त्यांच्या भाषेत स्पष्टीकरण/अर्थ सांगितला जाणार आहे.

वैष्णवी तिच्या गुरू श्रीम. सुचित्रा दाते यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक मरगम सादर करणार आहे. तिच्या गुरू त्यांच्या जेष्ठ विद्यार्थिनी, नृत्यशाळेच्या उपप्राचार्या श्रुती टेकावडे यांच्यासोबत नटूवंगम सादर करत आहेत, साथीला गायिका निथी नायर,वाद्यवृंद मृदुंग- श्री.पी. आर.चंद्रन, व्हायोलिन- श्री. बालसुब्रमण्यम सर्मा, बासरी- संजय शशीधरन, सूत्रसंचालन नृत्यशाळेच्या प्राचार्या नृपा सोमण मॅडम करत आहेत.

तर वरिष्ठ कलाकार प्रियांका मॅडम मूकबधिर व्यक्तींसाठी विवेचन देत आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व ज्यांनी भरतनाट्यम व कुचिपुडी नृत्याचे विक्रम तोडले आहेत.

अशा डाॅ. सुधा कांकरिया व प्रमुख पाहुणे भूषवित आहेत .प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका तुळसकर. वैष्णवीचे अरंगेत्रम पुण्याच्या सांस्कृतिक भूमीत एक अमिट छाप सोडेल अशी खात्री आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण :- PVG COET ऑडिटोरियम मुक्तांगण इंग्लिश स्कूल /जुनियर कॉलेज शिवदर्शन, पर्वती.

रविवार , दिनांक –  7/ 4 /2024.

वेळ :- संध्याकाळी 5 ते 8.

प्रवेश सर्वांसाठी खुला…

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे