
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील श्री साई समर्थ एग्रो एजन्सीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाले.
मंगळवारी सकाळ च्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्याने ही घटना उघडकीस आली. आग लागल्याचे समजताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. अग्निशमन विभागाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल होत दुकानाला लागलेली आग विझवली. तो पर्यंत दुकानातील बी बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते, औषधे जळून खाक झाले होते. आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजू शकले नाही.
परंतु आगीत सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे श्री साई समर्थ एग्रो एजन्सीचे संचालक शीतल प्रवीण कार्ले यांनी सांगितले.
श्री साई समर्थ एग्रो एजन्सी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांचे बंधू यांची आहे.