ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठा आरक्षण आंदोलनाची धग ST महामंडळाला

पुण्यातून एसटी बसच्या दररोज १ हजार ५५६ फेऱ्यांची नियोजन केले जाते. आंदोलनामुळे ७५० फेऱ्या रद्द करण्यात आल्यात.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे आज सलग पाचव्या दिवशी पुण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बस रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे पुण्यातून मराठवाडा विदर्भ आणि सोलापूरला जाणाऱ्या ७५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे विभागातून सुटणाऱ्या फेऱ्या १५५६

आंदोलनामुळं रद्द झालेल्या फेऱ्या ७७०

पुणे विभागाचे आर्थिक नुकसान ४० लाख २७ हजारपेक्षा जास्त

परभणी जिल्ह्यातही मराठा आरक्षणाची धग कायम आहे. चार दिवसांपासून परभणी, पाथरी, गंगाखेड, जिंतूर , हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या सात आगारातून धावणारी बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने परभणी विभागाला पावणे दोन कोटींचा फटका बसला आहे. लाल परीची सेवा बंद असल्याने खाजगी वाहन धारकांचे मात्र अच्छे दिन आले तर प्रवाशांच्या खिशाला मात्र मोठी कात्री बसली आहे.

सोमवारपासून नाशिकहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस देखील बंदच आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मागील ४ दिवसांपासून नाशिकहून मराठवाड्याकडे जाणारी एसटी सेवा बंद आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, सिल्लोड, परभणी, पैठण यासह मराठवाड्यातील अन्य शहरात जाणारी एसटी सेवा बंद आहे.

आंदोलकांकडून एसटी बसेसना टार्गेट केलं जात असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून नाशिकहून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बसेस अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्यात. मागील ४ दिवसांपासून बससेवा बंद असल्याने प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतोय.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे