ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली युवा शक्ती आणि स्नेहालयाच्या मदतीच्या हाताने प्रतिभाचे आयुष्य उजळेल …अजय म्याना

अहमदनगर प्रतिनिधी

एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत प्रतिभा आरगोंडा या विद्यार्थिनीला पद्मशाली युवा शक्तीकडून शैक्षणिक साहित्याची मदत.

“पद्मशाली युवा शक्ती ट्रस्ट आणि पद्मशाली महिला शक्ती गेल्या एक दशकापासून विविध सामाजिक उपक्रमांमधून समाजाला पुढे आणण्याचे काम करत आहे. वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, सायकल यांचे होतकरू किंवा गरजवंत मुलांना नियमित वाटप केले जाते.

स्नेहालय परिवाराने तर आपल्या सामाजिक कामाचा हिमशिखर उभा केला आहे. अश्या या दोन्ही संस्थांच्या संयोगाने होतकरू, हुशार, गुणी अश्या प्रतिभाला आज आपण देत असलेली मदत तिच्या आयुष्यात आशेची नवी पहाट घेऊन येईल. या छोटेखानी मदतीने प्रतिभाचे आयुष्य नक्की उजळेल ….!!” असे अजय म्याना म्हणाले.

ते स्नेहलयात आयोजित एक हात मदतीचा या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विचार मंचावर स्नेहालयचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार आणि रेडिओ नगरचे संचालक भूषण देशमुख, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम, पद्मशाली युवा शक्तीचे दीपक गुंडू , सुमित इप्पलपेल्ली आदी उपस्थित होते.

“माझ्या एका परिचित व्यक्तीकडून मला प्रतिभाची अडचण समजली. वडील मानसिक दृष्ट्या अक्षम, आई धुनी भांडी सारखी कष्टाची कामे करते, घरात कोणीच पुरुष माणूस नाही अश्या अनंत अडचणींचा डोंगर समोर उभा असतांना प्रतिभा जिद्दीने शिक्षण घेतेय आणि तिने नुकताच एस एस सी परीक्षेत चांगले गुण मिळवून शासकीय तंत्रनिकेतन मध्ये अभियांत्रिकी पदविकेसाठी प्रवेश घेतलाय, पण वह्या, पुस्तके, स्टेशनरी, गणवेश, जाण्या येण्यासाठी सायकल अश्या अनेक अडचणी अजूनही तिच्या समोर आहेत, त्या सोडवणे मला वाटलं आपली जबाबदारी वाटली.

कोण यासाठी पुढाकार घेऊ शकतो म्हणून मी एक साद दिली आणि त्याला पद्मशाली युवा शक्ती, महिला शक्तीच्या या बांधवांनी प्रतिसाद देत, प्रतिभाच्या आजच्या सर्व अडचणी सोडवून दिल्या. तिला भरीव मदत करत पुढे ही तिला मदतीचे आश्वासन दिले. आज प्रतिभाने घेतलेली मदत ती स्वतः पायावर उभी राहिल्यावर नक्की पुन्हा या समाजासाठी परतफेड म्हणून करेल , कारण आम्हाला घेणारा नाही तर देणारा समाज निर्माण करायचा आहे…..!!” असे गिरीश कुलकर्णी सर म्हणाले.

“आज जागतिक मैत्रीदिनाच्या दिवशी गिरीश सर आणि स्नेहालय परिवाराच्या मदतीने आम्हाला एका अत्यंत प्रेरणादायी उपक्रमाचा भाग होता आले हे आम्ही आमचे भाग्य समजतो. शिक्षणानेच समाजात आमूलाग्र बदल होणार आहे, आमच्या आयुष्यात ही तो शिक्षणामुळेच झाला आहे. पद्मशाली युवा शक्तीच्या मदतीने एक पद्मकन्या, एक आई आणि एक कुटुंब सावरतय ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. पुढे ही प्रतिभाच्या सर्व अडचणींसाठी स्नेहालय परिवाराबरोबर युवा शक्ती आणि महिला शक्तीचे तिचे बहीण भाऊ तिच्या पाठीशी ठाम उभे आहेत….!!” असं आपल्या प्रस्ताविकात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले. यावेळी प्रतिभा व तिच्या आईच्या हाती गणवेश, शूज, वह्या, पुस्तके, स्टेशनरी, थोडी रोख रक्कम व कॉलेजला ज्याण्या येण्यासाठी सायकल अशी मदत उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा शक्तीचे अजय म्यांना, सुमित इप्पलपेल्ली, सागर बोगा, श्रीनिवास एल्लाराम सर, दीपक गुंडू, योगेश म्याकल, सागर आरकल, श्रीनिवास इप्पलपेल्ली, योगेश ताटी, महिला शक्तीचे सुरेखा विद्ये, उमा बडगु, सारिका सिद्दम,लक्ष्मी म्याना, निता बल्लाळ, रेणुका जिंदम, सुनंदा नागुल, स्वाती गाजेंगी, सविता येंनगंदुल, स्मिता मंगलारप व स्नेहालय परिवाराचे संतोष धर्माधिकारी व सहयोगी कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे