ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ऑक्टोबर हिट तापदायक, सूर्य आग ओकणार

मुंबई

 गरम हवा, तापमानाचा ताप, आर्द्रतेमुळे होणारी काहिली, सातत्याने पाणी पिऊनही घशाला पडणारी कोरड, अतिरिक्त दमवणूक अशी अवस्था ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात मुंबईकर अनुभवत आहेत. मुंबईमध्ये सोमवारपेक्षा मंगळवारी किंचित कमी तापमान असूनही ताप मात्र अधिक जाणवत होता.

मुंबईत सांताक्रूझ येथे मंगळवारी ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २.१ अंशांनी अधिक होते. हे तापमान आणखी एक ते दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.

पावसाळी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर सध्या पूर्व आणि ईशान्येकडून वारे येत आहेत. यामुळे तापमानात वाढ झाली आहे.

मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे सोमवारी कमाल तापमान ३५.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले तर कुलाबा येथे ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. कुलाबा येथेही मंगळवारी सोमवारच्या तुलनेत ०.४ अंशांनी तापमान खाली उतरले. मात्र आर्द्रतेचे प्रमाण अजूनही ७० ते ८० टक्क्यांच्या पुढे असल्याने उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.

कोकण विभागात मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान सांताक्रूझ येथे होते. सध्या वारेही जाणवत नसल्याने वातावरणात प्रदूषके साचून राहिल्याचेही दिसत आहे. यामुळे मुंबईच्या हवेतील प्रदूषण निर्देशांक वाढताना दिसत आहे. मुंबईच्या हवेचा प्रदूषण निर्देशांक मंगळवारी १०५ नोंदला गेला. कोकण विभागात मुंबई वगळता उर्वरित केंद्रांवर सरासरीपेक्षा कमाल तापमान खूप वाढलेले नाही. रत्नागिरी केंद्रावर १.६ अंशांनी तापमान वाढ मंगळवारी नोंदली गेली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे