
भिंगारसह शहरामध्ये ‘वोकल फॉर लोकल’ शहर भाजपचे नागरिकांना आव्हान…
शहर भाजपच्या वतीने आज शहराच्या मध्यवर्ती भागासह भिंगार या ठिकाणी ‘वोकल फॉर लोकल’ या अभियाना अंतर्गत शहर विधानसभा निवडणुकीचे प्रभारी महेंद्र भैय्या गंधे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना आव्हान केले की, नागरिकांनी स्थानिक दुकानदाराकडूनच खरेदी करावी, ऑनलाइन खरेदी करू नये.
कोविड संकट काळात स्थानिक दुकानदारच आपल्या मदतीला धावून आले त्यामुळे आपलं शहर आपलं कुटुंब ही जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडावे असे आव्हान करत. भिंगार बाजारपेठे मध्ये नागरिकांना अभियानाचे माहिती पत्रक वाटप करण्यात आले .
यावेळी विधानसभा प्रमुख महेंद्र भैय्या गंधे, भिंगार कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष वसंत राठोड, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, माजी संघटन सरचिटणीस किशोर बोरा, माजी ओबीसी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, भिंगारची पदाधिकारी किशोर कटोरे, सुमित बटूळे, अमोल निस्ताने, एडवोकेट श्रीकांत ताके, सौरभ भांड, सिध्देश नाकाडे, जैन ओस्तवाल पथसंस्थेचे चेअरमन संतोष गांधी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.