ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

टीम इंडियाचा सेमीफायनल सामना वानखेडेवर नाही, कोलकातामध्ये होणार

भारत विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत दाखल झाला आहे. आतारपर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवून टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडिया ची विजयी वाटचाल कायम आहे. भारताने दक्षिण आफ्रिका वर दणदणीत विजय मिळवला. सलग आठ सामन्यांमध्ये विजय मिळत टीम इंडियाने उपांत्य फेरीत  प्रवेश केला आहे.

इतर दोन जागांसाठी सहा संघांमध्ये लढत आहे. उपांत्य फेरीतील सामने मुंबईतील  वानखेडे स्टेडिअमवर आणि कोलकात्याच्याईडन गार्डन स्टेडिअम  वर खेळवले.

टीम इंडियाचा सेमीफायनल सामना कुठे होणार?

टीम इंडियाने विश्वचषक 2023 मध्ये गट टप्प्यातील सलग आठ सामन्यांमध्ये विजय मिळवत पॉईंट टेबल अव्वल स्थान निश्चित केलं आहे. विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना मुंबईत होणार आहे. पण, जर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आणि चौथ्या स्थानावर राहिला तर टीम इंडियाच्या सामन्याचं ठिकाण बदललेल.

पाकिस्तानमुळे उपांत्य फेरीच्या सामन्याचं ठिकाण बदलू शकतं

पहिल्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाशी होईल. पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या तीन संघामध्ये चुरशीची स्पर्धा सुरू आहे.

पाकिस्तान संघ पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचण्यास यशस्वी ठरला तर, उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना भारताशी होईल. अशी परिस्थिती निर्माण झाली तर उपांत्य फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

आयसीसीचा मोठा निर्णय 

2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका खेळण्यावरही बंदी घालण्यात आली होती आणि पाकिस्तानी खेळाडूंना मुंबईत उतरण्यास बंदी घालण्यात आली होती

यामुळे विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीलाच ठरलं होतं की, जर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर पाकिस्तान संघ पॉईंट टेबलमध्ये कोणत्याही स्थानावर असला तरीही त्यांचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होईल

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे