NEET2026 पेपरफुटी प्रकरण…. अहिल्यानगर येथून एक जण ताब्यात, चौकशी सुरू

सरकारने NEET UG 2026 परीक्षा रद्द केली असून याचा तपास आता CBI कडे सोपवण्यात आला आहे. पण, ‘नीट’चा पेपर नेमका फुटला कसा? याबद्दलची धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी नाशिकमधील एका आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्याला मदत करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील साथीदाराचे नाव धनंजय लोखंडे असल्याचे समोर आले होते. धनंजय हा पुणे जिल्ह्यात काम करत असला तरी त्याचे मूळ गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. तो पसार झाला होता.
त्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज (ता. 13) अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतल्याचे समजते. धनंजय लोखंडे हा राहुरी तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते. सीबीआयचे पथक आज पहाटे अहिल्यानगर शहरात दाखल झाले. त्यांनी धनंजय लोखंडेचा तपास करत त्याला ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी पुण्यात नेण्यात आल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून समजते. तो पुण्यामध्ये कामाला होता. मात्र त्याचं मुळ गाव हे अहिल्यानगरचं असल्याने त्याला तेथून ताब्यात घेण्यात आलं आहे.
या पेपरफुटीचा उगम आणि प्रसार नाशिकमधून सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात 30 वर्षीय शुभम खैरनार या संशयित आरोपीला इंदिरानगर भागातून त्याला अटक करण्यात आली आहे.



