ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

माजी नगरसेविका शेख नसीम खानसाहेब सह 20 ते 30 महिलांविरूध्द गुन्हा दाखल, पोलीस अधीक्षक कार्यालयावर विनापरवाना मोर्चा.

अहिल्यानगर

अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून जिल्ह्यात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले. तसेच विनापरवाना जाहीर घोषणाबाजी व प्रतिमेचे प्रदर्शन केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पाच महिलांसह 20 ते 30 अनोळखी महिलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार अजय गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे. माजी नगरसेविका शेख नसीम खानसाहेब, शेख मुन्नी अयाज, शेख निदा जावेद, शेख सुमय्या झाकिर, आयशा खान व इतर 20 ते 30 अनोळखी महिलांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणारी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी कोलकत्याच्या नाझिया इलाही खान यांच्याविरूध्द तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातील महिलांनी केली आहे.

या मागणीसाठी बुधवारी (1 जुलै) सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे संबंधित महिलांनी एकत्र येत नाझिया इलाही खान यांच्या प्रतिमेचे विनापरवाना प्रदर्शन केले आणि जाहीर घोषणाबाजी केली.

दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी 19 जून रोजी काढलेल्या आदेशानुसार 2 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू होते. या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका संबंधित महिलांवर ठेवण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे