ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

उदय अब्राहम ढगे युवकावर भिंगार रस्त्यावरील फुटबॉल मैदानाजवळ पूर्व वैमनस्यातून कोयता आणि बांबूच्या दांडक्याने हल्ला

अहिल्यानगर

अहिल्यानगर येथील भिंगार रस्त्यावरील फुटबॉल मैदानाजवळ पूर्ववैमनस्यातून एका युवकावर कोयता आणि बांबूच्या दांडक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात उदय अब्राहम ढगे (वय 21, रा. शांतीनगर, केदारवस्ती, सोलापूर रोड) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबावरून नीलेश शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. भिंगार) आणि त्याच्या इतर चार अनोळखी साथीदारांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी उदय ढगे हे कोठी मार्केटयार्ड रस्त्यावरील एका रूग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.

28 जून रोजी दुपारच्या सुमारास नगर कॉलेजजवळ उदय आणि नीलेश यांच्यात रागाने पाहण्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला होता. 29 जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नीलेश एका अनोळखी साथीदारासह रूग्णालयासमोर आला आणि जुने वाद मिटवण्याच्या बहाण्याने उदय यांना भिंगार रस्त्यावरील फुटबॉल मैदानावर घेऊन गेला.

मैदानावर आधीच दबा धरून बसलेल्या इतर तीन अनोळखी साथीदारांच्या मदतीने उदय यांना बांबूच्या दांडक्याने आणि कोयत्याने मारहाण करून जखमी केले. नागरिकांची गर्दी जमा होताच संशयित दुचाकीवरून पसार झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे