
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकदीनं प्रयत्न होत असून मराठा मुलांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठा मुलांना त्रास देण्याचं ओबीसी नेत्यांचं षडयंत्र सुरु असल्याचे देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मनोज जरांगे म्हणाले की,उद्रेक करणाऱ्यांवर कारवाई करू नका असं आमचं म्हणणं नाही. पण जे सत्य आहे ते आहे. ओबीसीच्या काही नेत्यांच षडयंत्र मराठा नेत्यानी हाणून पाडावं. यांना वटतंत की खोटे गुन्हे दाखल केले की समाज खचेल. हे थांबवल नाही तर आम्हाला आमच्या पूर्वीच्या भूमिकेत यावं लागेल, आम्ही पण ५४ टक्के आहोत . देशात आम्ही जवळपास ३२ करोड आहोत , तुम्ही आम्हला त्या वाटेवर येऊ देऊ नका, बीड, नांदेडसह महाराष्ट्रातील एस.पी.वर पोलिसांवर दबाब आणला जातोय, असा आरोप मनोज जरांगे यांनी केलं.
यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी खळबळजनक दावे केले आहेत. भुजबळांच्या पाहुण्यांचं हॉटेल त्यांच्याच लोकांनी फोडलंय असा दावा जरांगे यांनी केला. तसेच मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकदीनं प्रयत्न केले जातायत. मराठ्यांविरोधात सध्या मोठं षडयंत्र सुरु आहे. मराठा मुलांना अडकवण्याचा अडकवलं जातंय. मराठा मुलांना त्रास देण्याचं ओबीसी नेत्यांचं षडयंत्र असा मनोज जरांगेंनी गंभीर आरोप केला आहे. मराठ्यांच्या मुलांविरोधात खोटे गुन्हे दाखल केल्यानं मराठे मुले घाबरतील आणि यांचं आंदोलन दडपून टाकू असं षडयंत्र ओबीसीचे नेते रचतायेत.