मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू
मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू झाला आहे. तिच्याच इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा दावा करण्यात आला आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला आहे.

मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू झाला आहे. तिच्याच इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा दावा करण्यात आल्याने मनोरजंन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान एकीकडे पूनम पांडेच्या अचानक मृत्यूमुळे आश्चर्य व्यक्त होत असून, दुसरीकडे तिच्यात अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करण्यात आल्याने काहीजण शंकाही उपस्थित करत आहेत.
पूनम पांडेने 2013 मध्ये नशा चित्रपटातून बॉलिवूमध्ये पदार्पण केलं होतं. मॉडेल, अभिनेत्री असणारी पूनम पांडे नेहमची वादग्रस्त राहिली आहे. कधी आपली विधानं तर कधी बोल्ड कपड्यांमुळे ती नेहमीच वादात अडकली.
दरम्यान इंस्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ”आजची सकाळ आमच्यासाठी फार कठीण होती. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, आपण पूनमला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे गमावलं आहे. या दु:खाच्या काळात, आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी विनंती आहे”.
पूनम पांडे प्रसिद्धीत राहण्यासाठी अनेकदा असे स्टंट करत असल्याने तिचा खरंच मृत्यू झाला आहे की हा आणखी एक पब्लिसिटी स्टंट आहे अशी शंका नेटकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान मृत्यूची इंस्टाग्राम अकाऊंट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
एका युजरने म्हटलं आहे की, सरकारने लसीकरणाची घोषणा केली असल्याने हा तिचा एक मार्केटिंग स्टंट असू शकतो तर एकाने हा मार्केटिंग स्टंट नसावा अशी आशा व्यक्त केली असून, जर खरंच तिचा मृत्यू झाला असेल तर आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना केली आहे.