ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

अहमदनगर

मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा फेरविचार व्हावा व मुळा धरणातून पाणी न सोडता गरज भासल्यास निळवंडे धरणातून पाणी सोडावे, या मागणीसाठी नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घोडेगाव येथे २ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन होणार आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने वाहतुकीची कोंडी होवू नये, यासाठी नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. गुरुवारी (दि. २) सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे बदल असतील.

नगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या वाहतुकीकरिता पांढरी पूल, वांबोरी फाटा, शिंगणापूर फाटा (राहुरी), सोनई, शिंगणापूर, नेवासा फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगर असा राहील.

त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरकडून नगरकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था नेवासा फाटा, कुकाणा, शेवगाव, मिरी, पांढरी पूलमार्गे राहील. कुकाणा मार्गे नगरकडे येणारी सर्व वाहने चांदा, शंकरवाडी, मिरी,पांढरीपूल मार्गे येतील.

अवजड वाहने आंदोलन कालावधीत रस्त्याच्या बाजूलाच थांबवली जातील. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर- संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक बदलाचे आदेश जारी केले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे