श्री मार्कंडेय विद्यालयाच्या 1994 च्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा 19 ला संजोग लॉन येथे होणार संपन्न
अहमदनगर

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे संयोजन समितीचे आवाहन
येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या 1994 च्या दहावीच्या बॅच च्या विद्यार्थ्यांनी येत्या 19 नोव्हेंबर ला संजोग लॉन येथे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे. सकाळी 9 वाजता गांधी मैदानातील श्री मार्कंडेय विद्यालयात सर्व विद्यार्थी आपल्या माजी शिक्षकांच्या सह उपस्थित राहून आपल्या 29 वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा देतील. तेथून पुढे मुख्य कार्यक्रम नगर मनमाड रोडवरील संजोग लॉन येथे होईल, असे माजी विद्यार्थी मेळावा संयोजन समितीचे ज्ञानेश्वर मंगलारम यांनी सांगितले.
“आयुष्याच्या या टप्प्यावर आता पुन्हा एकदा मागे वळून पाहताना मला मित्र मैत्रिणींनो आपल्या साथीची, भेटीची आणि सोबतीची विशेष ओढ वाटते म्हणून तर आता सर्व बंधनं टाकून सवड नसताना आवडीसाठी आपण भेटूया…!!” असे मंगलारम पुढे म्हणाले तर, “एक जादा तास जो आपल्या आयुष्यातील आनंदाचे तास वाढवणार आहे.
आपल्याच लाडक्या शाळेत 19 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता. तिथून पुढे आपली एक धमाल डब्बा पार्टी होईल संजोग लॉन मध्ये.. वेळ तर मला ही नाही पण तुमच्या सर्वांच्या ओढीने आणि आता जरा आयुष्याचा अजून एक सुंदर जादा तास मिळतोय म्हणून माझा वेळ राखून ठेवला आहे असे त्रिलेश येनगंदुल म्हणाले, यावेळी मी चुकणार नाही आपण तर कायम माझी चूक दुरुस्त करता… आपली वाट पाहतोय…
तुम्ही ही नक्की या…!!” असे ॲड. हराळे जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करतांना म्हणाले.