ब्रेकिंगमहाराष्ट्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिर्डीत
अहमदनगर - साईबाबांचे घेणार दर्शन, नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन करणार, निळवंडे धरणाचेही जलपूजन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. दुपारी एकच्या सुमारास पंतप्रधान अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचतील.
तेथे ते श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा व दर्शन घेतील. यादरम्यान ते मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही करणार आहेत. दुपारी 2 वाजता पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन करतील.