ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

आ. निलेश लंके यांच्या पुढाकाराने १ लाख २७ हजार महिलांना मोहटादेवी दर्शनाचा लाभ

अहमदनगर

आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने यावर्षी नवरात्र उत्सवात पारनेर नगर मतदारसंघातील १ लाख २७ हजार महिलांना मोहटादेवी दर्शनाचा लाभ मिळाला.‌ याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करीत आ.लंके यांनी म्हटले आहे की प्रथमतः सर्वाना सस्नेहपूर्वक नमस्कार..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रा सोमवार दि.१६/१०/२०२३ रोजी मोठया उत्सवात सुरू झाली व काल रविवार दि.२२/१०/२०२३ रोजी या यात्रेची सांगता झाली.

या यात्रा उत्सव काळात पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील १ लाख २७ हजार माता भगिनी यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला व माता मोहटादेवी दर्शनाचा लाभ घेतला. त्याबद्दल मी माझ्या सर्व माता भगिनींना मनपूर्वक धन्यवाद देतो.

माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रा यशस्वी उत्तम रित्या पार पाडण्यासाठी तन-मन-धन सर्वस्वी स्वताला झोकून देऊन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी माझे सर्व सहकारी, सभासद, हितचिंतक , पत्रकार मित्र, मार्गदर्शक, पोलीस यंत्रणा, सोशल मीडिया टीम,वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर्स, वाहतुक करणारे सर्व बसचे ड्रायव्हर,महाप्रसाद बनवणारे आचारी टीम,मंडप स्पीकर व्यवस्था देणारे तसेच पाथर्डी/शेवगाव परिसरातील मदत करणारे सर्व सहकारी माता मोहटादेवी यात्रा उत्सव निर्विघ्न पणे उत्तम रित्या पार पाडण्यासाठी आपल्या सर्वाची लाख मोलाची साथ मिळाली त्याबद्दल मी सर्वाचे मनपूर्वक त्रिवार आभार व्यक्त करतो.

तुमच्या सर्वाची साथ प्रेम सदैव माझ्या पाठी राहो हीच माता मोहटादेवी चरणीं प्रार्थना..

तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो व तुम्हा सर्वांना अशीच मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी माता मोहटादेवी उत्तम निरोगी असे दीर्घ आयुष्य देवो हीच माता मोहटादेवी चरणी प्रार्थना..

आपलाच

आमदार श्री.निलेश ज्ञानदेव लंके

२२४ पारनेर-नगर विधानसभा मतदार संघ

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे