ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश कार्यकारीणी चिटणीस – गीता गिल्डा यांच्या शी दिलखुलास‌ गप्पा..

अहमदनगर

गीता ताई या जो समाज वंचित आहे. ज्या समाजात महिला व पुरुष स्वच्छता कामगार म्हणून काम करत आहे. अशा वस्ती मध्ये जाऊन शासनाच्या सर्व योजना  सांगण्याचा उपक्रम चालू केला आहे.‌

गीता ताईंनी यात अनेक महिला आणि तरुण मुले यांना योजना समजावून सांगितल्या. आणि  शासनाच्या ऑफिस पर्यंत त्यांना  घेऊन जाऊन सर्व काही त्यांच्या नोंदी करवून घेतल्या.

त्याचबरोबर मोदींचा सप्टेंबर मध्ये वाढदिवस असतो.म्हणून उज्वल गॅस योजना आणि आयुष्यमान भारत कार्ड या सरकारी कार्यालयात चालू झालेल्या योजनांची माहिती त्यांनी सगळ्या महिला ग्रुप मध्ये टाकून विचारले की कोण या साठी काम करायला तयार आहे. आणि अशा कार्यकर्त्या तयार करून स्थानिक स्तरावर  महिलांनी उज्वला गॅस योजनांची  माहिती दिली.आणि सरकारी ऑफिस दाखवले.त्यामुळे दर महिन्याला ज्या महिला आकराशे रुपये भरत होत्या. त्यांना आता केवळ सहाशे रुपये भरावे लागतील. कारण पाचशे रुपयांची सवलत ही सरकारनी घोषित केले आहे. हे या लोकांना माहिती करून दिली.

श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक हिंगणी गाव आहे. बेलवंडी फाटा जवळ तिकडे रात्री साडेआठ वाजता गीता ताई विठोबा रखुमाई मंदिरात गेल्या होत्या. मंदिरा बाहेरच्या आवारात मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबवण्यासाठी गेल्या होत्या.

रात्री साडेआठ वाजता दोनशे महिला तिथे उपस्थित होत्या. सर्व महिला शेती व्यवसायाशी निगडित होत्या. ताई सरळ त्या महिलांच्या ग्रुप मध्ये गेले. आणि त्यांना सांगितले धरणी माता आणि मेरी मिट्टी मेरा देश या बद्दल माहिती सांगितली. त्या बरोबर  त्यातली एक वीस वर्षाची तरुणी उभी राहिली आणि म्हणाली माझ्या पासून सुरुवात करा.  अ्से तिने सांगितले. माझा  आधी फोटो काढा. कारण जे काही आपल्याला मिळते ते या मातीतून च मिळते.हे ऐकून तिने सेल्फी तर काढून घेतली.आणि मग काय पटापट सगळ्या जणी सेल्फी काढण्यासाठी पुढे आल्या

मग त्यांच्या सरपंच आणि उपसरपंच महिलांची ताईंनी भेट घेतली . या महिला काही नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या होत्या परंतु त्यांचे व्यवहार ज्ञान आणि त्यांच्याकडे असलेली त्यांची पोस्ट याबाबत त्या अतिशय जागृत दिसल्या याचे  खूप कौतुक वाटले .

यानंतर  त्यांनी गीता ताईंना जेवायला विचारले तेव्हा ताईंनी सांगितले नाही माझे उपास आहे मी बाहेर काही खात नाही. तर त्यातल्या एका शेतकऱ्याने लगेच एक सीताफळ आणून ठेवले .याचे सुद्धा खूप कौतुक वाटले.

शेतकरी या खरंच जगाचा पोशिंदा असतो आणि तो सगळ्यांना खाऊ घालत असतो आणि त्याचं मनही खूप मोठा असतं.

यावेळेस ताईं सोबत राखी आहेर, कालिंदी केसकर , नीता देवराईकर, फसले माया, अंजली आहेर  होत्या.

मोहटा देवी येथे सुद्धा आम्ही गेलो होतो.तेव्हा आम्ही ठरवले की खूप मोठी रांग होती तर कळसाचे दर्शन घ्यावं आणि मगच आणि परत यावा. त्यानुसार आम्ही सेल्फी काढायला सुरुवात केली केल्या आणि काय सांगू अतिशय उत्कृष्टपणे प्रत्येक महिला मोदींसाठी काही पण, ते तर आमचे पालक आहेत असे म्हणू लागले .

केडगाव बुरानगर, निंबळक, ईसळक, शेवगाव , नगर एमआयडीसी, अशा अनेक ठिकाणी मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान राबवले.

यामध्ये आम्ही दोन टीम केल्या होत्या. सकाळी एक टीम जात होती. आणि परत संध्याकाळी सुद्धा दुसरी टीम-चार नंतर ठिकाणी जाऊन ही अभ्यास लागत होती .

साधारण याच्या दिवसात 3000 च्या पुढे आम्ही सगळ्यांच्या मिळून सेल्फी काढणे काढल्या माझ्या वैयक्तिक 500 अधिक झाल्या.

ताई म्हणतात की अनुभव एक सांगते जेव्हा आम्ही एका पुरुषाला असे सांगत होतो की आपण एक फोटो काढता का त्यांनी कारण विचारले आणि कारण विचारल्यानंतर लगेच त्यांनी आपल्या पायातील चप्पल काढून मगच हातात माती घेतली. आणि फोटो काढला परत त्या मातीला डोक्याची धरून वंदन केले.

जेव्हा ताईंनी एका आजीचा फोटो काढला आणि सांगितले की आज आपण आपल्या धरणी मातेलाही बंधन करायचे आहे.

तेव्हा त्या चक्क आमच्या पाया पडू लागल्या आणि नमस्कार करू लागल्या आणि ताबडतोब त्यांना पुन्हा खाली वाकून पायाला हात लावून व्यवस्थित नमस्कार केला. त्या बाईंनी आम्हा सर्वांना जवळ घेतले आणि सांगा म्हणाले की जे काय आहे ते मातीतच आहे सुरुवात. आणि अंत किती मोठी गोष्ट ती आजी सांगून गेली.

जाता जाता त्यांनी पिशवीतून एक केळी काढली आणि आम्हाला खाऊ घातली. आणि म्हणाल्या किती वेळा पासून तुम्ही उभे आहात घ्या खाऊन थोडसं आम्ही आम्ही तिघी मध्ये एक केळी घातली .

परंतु खूपच समाधान वाटले आणि त्या बाईचा कौतुक वाटलं जणू काही ती देवीच आम्हाला प्रसाद देऊन गेली.

जेव्हा आपण कुठे श्रद्धा ठेवतो आणि एक श्रद्धास्थान आपल्या जीवनामध्ये राहते. तेव्हा माणूस कोणत्याही संकटाला सामोरे जाताना डगमगत नाही. अगदी आम्ही तसेच तृतीयपंथी यांचे सुद्धा सेल्फी काढले .

तेव्हा सुद्धा त्यांच्या डोळ्यात तुम्ही आमचा फोटो काढला म्हणून पाणी आलेले आम्ही पाहिले.

हा प्रसंग खूपच वेगळा वाटला.  परंतु त्यांनाही आपले मोदी माहिती  असल्याचे  खूप आश्चर्य वाटले.

ताई म्हणतात माझी दुसरी टीम आहे . खूप ठिकाणी फिरली आणि त्यांनीही तिकडे भरपूर असेल ठीक आहे . दिवसभर गाडी फिरतच होती.  आणि हे सारे सौजन्य आम्हाला आमच्या सुजय दादा खासदारांनी दिले.

त्यांनी आमच्यावर हा जो विश्वास ठेवला याचा आम्हाला खूप समाधान आहे. आम्ही अनेक लोकांना भेटलो आणि मोदीं बद्दल ही विचारले त्यांना . त्यांची सभा आहे तुम्हाला यायला आवडेल का असेही विचारले तर अतिशय आनंदाने त्यांनी सांगितले की आम्ही नक्कीच त्यांना बघायला म्हणून जाऊ आम्हाला त्यांना बघायचे आहे .

गीता ताई पुढे म्हणाले की माहेश्वरी समाजाशी निगडित आहे आमच्या समाजात एकूण नगर शहरांमध्ये सहा मंडळे आहेत ही सारी मंडळी मागच्या पंचवीस वर्षांमध्ये एरिया वाईज स्थापन करण्यात आली. त्यातील सगळ्यात पहिले मंडळ माझे होते.

राजस्थानी महिला मंडळ त्यानंतर त्यांनी राजस्थानी बहुमंडळ हे 25 वर्षांपूर्वी स्थापन केले केली. त्यामध्ये मी होते आणि आहे परंतु आता आम्हाला सगळ्यांनाही सुना आल्या म्हणून आम्ही जुनियर राजस्थानी बहु मंडळ दोन वर्षांपूर्वी स्थापन केली. आणि त्याची पहिली  प्रेसिडेंट मी होते. आता माझी सून पूजा पौरस गिल्डा.

कन्या पूजनासाठी शंभर मुलींनी नोंदणी केली होती. मुलींचा जन्मदर वाढावा मुलींनी भरपूर शिक्षण घ्यावे मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे. तसेच तिला समाजामध्ये आदर व्हावा मुलगा आणि मुलगी मध्ये भेद नसावा . याकरिता म्हणून हा कन्या पूजनाचा कार्यक्रम तिने आयोजित केला होता आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.

अशा या आघाडीच्या धडाडी कार्यकर्त्या गीता गिल्डा….

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे