ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
शनिदेवास भाविक दररोज वाहतात एक हजार लिटर तेल
भाविकांनी वाहिलेल्या तेलातून शनिशिंगणापूर देवस्थानला वर्षभरात मिळते एक कोटी रुपयाचे उत्पन्न

शनिशिंगणापूरला शनिदेवास भाविकांच्या वतीने तेल वाहण्याची परंपरा आहे. भाविकांनी वाहिलेले दररोज एक हजार लिटर तेल जमा होते. त्यातून पाणी व तेल वेगळे केले जाते. अखाद्य तेल म्हणून सरकारनेही त्यास मान्यता दिली आहे. शनिदेवाच्या चौथऱ्यापासून पाईपने हे तेल बाहेर नेऊन एका दहा हजार लिटरच्या टाकीत सोडले जाते. तिथेच तेल व पाणी वेगळे केले जाते. नंतर याच तेलाच्या विक्रीचा ठेका दिला जातो. याच अखाद्य तेलाचा विक्रीनंतर या तेलाचा उपयोग साबण व वंगण तयार करण्यासाठी केला जातो. यातून देवस्थानला वर्षाकाठी एक कोटीचे उत्पन्न मिळते.
शनिअमावस्या यात्रेलाही वाहिलेले विक्रमी तेल जमा होणार आहे.