ब्रेकिंगमहाराष्ट्र
माजी नगरसेवक आरणेंच्या उपोषणास शिर्डीतील पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा
शिर्डी - नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांनी फोनवर घेतली माहिती

नगरपरिषदचे माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्या विविध मागण्यासाठी सुरू केलेल्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी विविध मान्यवरांनी भेट देऊन या उपोषणाला पाठिंबा दर्शवला. दर्शन पासची काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करावा तसेच साई संस्थान देणगी काउंटरबाबत झालेल्या गैरप्रकारात यात आणखी दोषी असलेल्या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, साईबाबांच्या मंदिरात हार, फुले विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी शिर्डीतील माजी नगरसेवक आरणे यांनी गुरुवारपासून उपोषण सुरू केले.